मुंबई: कुर्ला-कालिना येथे आयोजित कोकण महोत्सव 2025 मध्ये नृत्य स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत पवन हरीश कटके याने उत्कृष्ट नृत्यप्रदर्शन करून द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील लोकप्रिय द्वितीय पारितोषिक पवन कटके याला मिळाल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सदर महोत्सवात नृत्य, गायन, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. दशरथ सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य स्पर्धा अधिक लोकप्रिय झाली. पवन कटकेच्या दमदार कामगिरीमुळे त्याला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.