शिरोली (वार्ताहर) शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे असणे अतिशय अनिवार्य असून विद्यार्थ्यांची सुरक्षितता अतिशय महत्त्वाची आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांनी खाजगी शाळांच्या बरोबर स्पर्धा करत शाळांची पटसंख्या वाढवावी
महाडिक उद्योग समूहामार्फत शाळांना लागेल ते सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडीक यांनी केले. शिरोली येथे ज्ञानदीप विद्यालयात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट या उद्योग समूहाच्या वतीने शाळांना सीएसआर मधून पुरविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. आमदार अमल महाडिक व मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळांच्या वतीने आमदार अमल महाडिक यांचा सत्कार करण्यात आला .
केंद्रप्रमुख कृष्णात पाटील म्हणाले की, महाडिक उद्योग समूहाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासून अनन्यसाधारण काम केले आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे देऊन अतिशय मोलाचे ,भरीव,
समाजाभिमुख काम केले आहे. यावेळी माजी
उपसरपंच कृष्णात करपे ,राष्ट्रसेवा मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील ,उत्तम पाटील ,ग्रामपंचायत सदस्य आरिफ सर्जेखान, हर्षदा यादव ,अनिता शिंदे, दीपक यादव ,धनाजी यादव, संतोष यादव, संदेश शिंदे ,दत्ता पुजारी, शिवाजी कोरवी, संपत चौगुले, मुख्याध्यापक दीपा देऊडकर ,अंजना संकपाळ ,राजेश जाधव ,बाळासाहेब आळतेकर ,संदीप कोरवी ,तब्बसूम पटेल , झाकीर मुजावर यांच्यासह ग्रामस्थ पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन धर्मराज शिनगारे यांनी केले.