शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचे 32 वर्षानंतर गेट-टुगेदर
हेर्ले (वार्ताहर): तब्बल 32 वर्षानंतर छत्रपती शहाजी महाविद्यालय कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर मोठ्या उत्साहात व निसर्गमय वातावरणात पार पडले
तब्बल 32 वर्षानंतर एकत्र भेटलेल्या सर्व मित्रांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. सर्वच मित्रांनी आपापल्या क्षेत्रात मिळवलेले नेत्रदीपक यश व त्यांची घोडदौड ऐकून सर्वांचा उर अभिमानाने भरून आला. काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर "फ्रेंड्स फॉरएव्हर" हा ग्रुप तयार करण्यात आला. त्यातूनच या गेट-टुगेदर च्या सोहळ्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. या कार्यक्रमासाठी नोकरी व्यवसाय निमित्त परराज्यात, परजिल्ह्यात असणाऱ्या मित्र परिवाराने नियोजित तारखेच्या अगोदरच उपस्थिती लावली. यामध्ये उद्योगपती, आयटी अधिकारी, मोठ्या कंपनीचे अधिकारी ,डॉक्टर राजकीय नेते, रिक्षा व्यावसायिक, शेतकरी ,शिक्षक, पत्रकार ,प्राध्यापक शासकीय अधिकारी असे सर्व क्षेत्रात मातब्बर असणारी मंडळी एकत्रित आले .निसर्गरम्य वातावरणात कॉलेजमधील विविध आठवणींच्या गप्पात व एकमेकाविषयी असणाऱ्या आदर भावात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी संतोष पाटील ,अजित जाधव, संजय शेलार, संभाजी पवार, नितीन खराडे अमोल तोडकर ,मोहन ठोंबरे ,राजेश जाधव इसाक पठाण ,युवराज खाडे,अनिल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमास सरपंच दिलीप पाटील ,प्रा. संजय काशीद, कृष्णा चोपडे ,मारुती पाटील ,डॉ अरुण शिंत्रे ,विजय पाटील, सर्जेराव शिंदे, रंगराव गोसावी, संजय पाटील, मुन्ना बागवान ,सोमनाथ जाधव ,सतीश महाजन, रंभाजी भोसले ,संभाजी भोसले, सतीश महाजन , यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सर्वच मित्रांनी शोले या चित्रपटातील ये दोस्ती हम नही छोडेंगे हे गीत सादर करून धमाल मस्ती केली.
फोटो ओळ गेट-टुगेदर च्या निमित्ताने तब्बल 32 वर्षांनी एकत्र आलेले छत्रपती शहाजी महाविद्यालय कोल्हापूरचे विद्यार्थी