संकल्प विद्यालयाच्या प्रकाश सुतार यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
साने गुरुजी वसाहत ता.१०
आपटेनगर परिसरातील संकल्प माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश पांडुरंग सुतार यांना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय असे दोन पुरस्कार विविध संस्थांच्या वतीने मिळाले. डी. एस. राठोड फाउंडेशन, मार्शल योगा अकॅडमी व इंडियन पोलीस मित्र भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते मिळाला. पिरवाडी (ता.करवीर) येथील सावली केअर सेंटर मध्ये हा कार्यक्रम झाला. स्मृतिचिन्ह मानपत्र शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. वाय. एस. पी. सदानंद सदांशिव होते. या कार्यक्रमात जर्मनी जपान फिलिपिन्स या देशातील व्यक्तींबरोबरच गोवा कर्नाटक इतर राज्यातील विविध क्षेत्रातील ५३ व्यक्तींना असे पुरस्कार देण्यात आले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख आनंद गिरी, इंडियन पोलीस मित्र भारत चे महासंचालक डॉक्टर कृष्णदेवगिरी, अँडव्होकेट डॉ.सुशील अग्रवाल, निवृत्त असिस्टंट डायरेक्टर विठ्ठल मुरकेवार, डॉ. सुरेश राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार मिळाला.
धम्म भवन चारिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाला. शाहू स्मारक भवन मध्ये झालेल्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनात हा पुरस्कार देण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक व्यंकपा भोसले ,कवी दंगलकार चंदनशिवे, अमर कांबळे, अँड. करुणा विमल आदी उपस्थित होते.