महाराष्ट्र पत्रकार संघाच्या हातकणंगले तालुका उपाध्यक्षपदी राहुल रत्नपारखे यांची निवड
हातकणंगले: महाराष्ट्र पत्रकार संघाच्या हातकणंगले तालुक्याच्या उपाध्यक्षपदी पत्रकार राहुल रत्नपारखे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पत्रकार क्षेत्रातून तसेच विविध स्तरांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राहुल रत्नपारखे हे पत्रकारितेत विशेष योगदान देऊन, समाजातील समस्या, सकारात्मक घटना आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सतत आवाज उठवणारे म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीमुळे संघाच्या कार्याला नवे बळ मिळणार आहे.
निवडीनंतर राहुल रत्नपारखे यांनी पत्रकार हितासाठी व समाजाच्या विकासासाठी प्रभावी भूमिका बजावण्याचा संकल्प केला.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.