हौसाबाई कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी व फिजिओथेरेपी
सेंटरच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न
सेंटरच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न
निमशिरगाव (ता. शिरोळ) - डॉ. सुकमार जे. मगदूम फाउंडेशनच्या हौसाबाई कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी आणि हौसाबाई फिजिओथेरेपी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणमहर्षी स्वर्गीय डॉ. जे.जे. मगदूम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी व अल्पदरातील उपचार शिबिर मंगळवार, दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी उत्साहात पार पडले.
शिबिरामध्ये विविध आजारांवर उपचार घेत २४२ रुग्णांनी सहभाग नोंदवला. यामध्ये मानदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, खांदेदुखी, टाचदुखी, सायटिका, स्नायूदुखी, मणक्याचे आजार, लकवा, खेळाडूंच्या दुखापती, शस्त्रक्रियेनंतरचे व्यायाम, सेरेब्रल पाल्सी, मेंदूचा झटका अशा आजारांवर तपासणी व उपचार करण्यात आले.
शिबिराची सुरुवात संस्थेचे चेअरमन मा. डॉ. सुकमार जे. मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संस्थेच्या व्हॉइस चेअरमन व प्राचार्या सौ. डॉ. शुभांगी एस. मगदूम, मॅनेजिंग डायरेक्टर मा. तेजस मगदूम सर, फिजिओथेरेपी कॉलेजचे प्राचार्य व्यंकटेश के., अकॅडमी डायरेक्टर डॉ.विद्याधर खनाज, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
या शिबिरामुळे परिसरातील रुग्णांना तज्ज्ञ उपचार व मार्गदर्शन मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.