३१ डिसेंबरच्या रात्री राजारामपुरी पोलिसांनी केला ३ किलो गांजा जप्त
पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत यांच्यासह पथकाची धडाकेबाज कामगिरी
कोल्हापूर शहर भागात ३१ डिसेंबर निमित्त मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.रात्री ११.४० च्या दरम्यान राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार संदीप सावंत यांना सुत्रांकडून माहिती मिळाली की राजारामपुरी येथील ११व्या गल्लीमध्ये एक व्यक्ती गांजा विक्री करत आहे.मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजणे व कॉन्स्टेबल संदीप सावंत यांनी सदर ठिकाणी छापा मारला.या छाप्यात सनत प्रताप देशपांडे ,वय ३४, रा.गुणगौरव अपार्टमेंट,राजारामपुरी ९ वी गल्ली याला अटक करून अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ७८,२५० रुपये किंमतीचा ३ किलो गांजा सापडला.मिळालेला गांजा व त्याच्याकडील मोबाईल असा एकूण ८८,२५० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण,उपनिरीक्षक दत्तात्रय भोजणे,सहा. फौजदार समीर शेख,पोहेकॉ अरविंद पाटील,पो. कॉ संदीप सावंत,विशाल शिरगावकर,अमोल पाटील,सत्यजित सावंत,सुशांत तळप,नितीश बागडी,सुरेश काळे,सारिका गौतम व प्रियांका जनवाडे यांनी केली.