बस्तवडे कबड्डी स्पर्धेत हेरलेच्या शाहू सम्राट मंडळाला चौथा क्रमांक
बस्तवडे, ता. कागल (जि. कोल्हापूर) येथे झालेल्या 50 किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धेत हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील शाहू सम्राट मंडळाने चौथा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत अनेक संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले, त्यात शाहू सम्राट मंडळाने आपल्या खेळ कौशल्याने दमदार कामगिरी केली.
संयुक्त बौद्ध समाजाच्या वतीने मंडळाच्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या यशामुळे हेरले गावाचे नाव कबड्डी क्षेत्रात उंचावले असून, या संघाकडून भविष्यात अधिक उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.