शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आश्वशित प्रगत योजना लागू करण्याची मागणी
कोल्हापूर,: 2 फेब्रुवारी 2025 – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वशित प्रगत योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या प्रतिनिधींनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी निवेदन सादर केले. त्यांनी सरकारकडे ही योजना त्वरित लागू करण्याची मागणी केली, जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधीतील लाभ मिळू शकतील.
या वेळी संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य अविनाश ढोणे, मनोहर जाधव, संभाजी साळोखे, प्रताप पाटील, संतोष संकपाळ, अशोक कटके, विद्यानंद जाधव आदी उपस्थित होते.