सालाबादप्रमाणे सेवेन्थ डे हायर सेकंडरी स्कूल, कोल्हापूर येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक मनोहर कर्नाड यांनी स्वागत केले. शाळेचे प्राचार्य टी.मोहनराव यांनी प्रस्तावना केली प्रस्तावनेमध्ये त्यांनी शिवजयंतीचे महत्त्व सांगितले .त्याचप्रमाणे शाळेचे शिक्षक व्याख्याते व लेखक आण्णासाहेब कांबळे यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचे आदर्श आहेत त्यांचे विचार व व्यक्तिमत्त्व आपल्या जीवनात खूप प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे लोककल्याणकारी कसे होते ते विद्यार्थ्यापुढे त्यांनी मांडले .
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मर्दानी खेळ ,योगा ,कवायत, प्रेरणादायक शिव गीते, पोवाडा यांनी वातावरण अगदी शिवमय झाले होते. विद्यार्थी व विविध पोषकामधील शिक्षक यांचा उत्साह वाढला होता . सूत्रसंचालन अनिका यादव व स्वरा भोसले या विद्यार्थिनींनी केले.आभार शाळेच्या पर्यवेक्षिका जेनिफर लंका यांनी मांनले कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,पालक, व विद्यार्थी उपस्थित होते.