शहापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी कौशल्य दाखवत सात मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. दाखल गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील 3, इचलकरंजीतील 1, शिवाजीनगरातील 1 आणि इतर 2 असे एकूण 7 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड झाले. या तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल ₹2,00,000/- किंमतीच्या 7 मोटारसायकली हस्तगत केल्या. तपास पथकातील श्री असिफ कलायगार (पो.कॉ.) यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे. शहापूर पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.