शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समितीचे गुरुवारी धरणे आंदोलन
कोल्हापूर, ता. 5 : राज्यातील शासकीय व निमशासकीय शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवार, ६ मार्च रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर दोन तास धरणे आंदोलन - सत्याग्रह करण्यात येणार आहे.
माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजना (१०:२०:३० वर्षे), शिक्षक पदावर विनाअट पदोन्नती, रिक्त पदे भरती, तसेच २४ वर्षांचा वेतन लाभ लागू करावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष- बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष- अशोक पाटील, श्रीधर गोंधळी, कार्याध्यक्ष - संजय पाटील व सचिव - मनोहर जाधव यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे.
तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकेतर बांधवाना आवाहन करणेत येते कि आपण दिनांक 06 मार्च 2025 रोजी दु. 01.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे धरणे आंदोलन करिता उपस्थित राहावे.