कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 2017 च्या नियम 5 उपनियम (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धकांचा वापर वर्षातील एकूण 15 दिवसांसाठी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत करण्याकरिता आदेश पारित केले आहेत. तथापि जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी या आदेशात दुरुस्ती केली असून गणपती उत्सव - दि. 4 सप्टेंबर 2025 तसेच ईद-ए-मिलाद - दि. 5 व 6 सप्टेंबर 2025 या दिवसांना सुट घोषित करण्यात आली आहे.