कोल्हापूर - खिंडी व्हरवडे (ता- राधानगरी) येथील बळवंत सखाराम शेटके (वय 50) हे बुधवार दिनांक 28 रोजी सकाळी सातच्या सुमारास शेतात काम करीत असताना त्यांना गव्याने जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते.तेथे उपचार चालू असताना गुरुवार दि.29/08/2024रोजी सकाळच्या सुमारास त्यांचा मृत्यु झाला. सदर घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.