द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर शाखेच्या उपसंपर्क प्रमुख पदी सुनिल पाटील यांची निवड
कोल्हापूर : - द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.शेख अन्सार बाबासाहेब यांनी अलीकडेच कोल्हापूर जिल्ह्यात द युवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना केली असून द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर शाखेच्या जिल्हा उप संपर्कप्रमुख- सुनिल पाटील यांची निवड करण्यात आली. बच्चे सावर्डे, ता.पन्हाळा जि. कोल्हापूर सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील एका सर्वसामान्य व्यक्तीची निवड झाली आहे. सुनिल पाटील यांनी विविध माध्यमांतून सामाजिक व शैक्षणिक कार्य केले आहेत. त्यांच्या या सामाजिक
कार्याची दखल घेऊन अलिकडेच त्यांना उत्कृष्ट बातमी संकलन प्रसार माध्यम पुरस्कार मिळाला आहे. अशा सामाजिक कार्य करणाऱ्या एका तरुण व्यक्तिमत्वाची कोल्हापूर जिल्हा उप संपर्कप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल परिसरातील त्यांचे मित्र परिवार, नातेवाईकासह पन्हाळा तालुक्यातील अनेक मान्यवरांच्याकडून कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
श्रीमती भा.रा.यादव हायस्कूल बच्चे सावर्डे, विद्या मंदिर बच्चे सावर्डे, सातवे हायस्कूल सातवे व गर्ल हायस्कूल सातवे.या विद्यालयामध्ये सत्कार करण्यात आला.