म. गांधी विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धासाठी निवड
रुकडी :- दि.
सातारा येथे पार पडलेल्या शालेय किक बॉक्सिंग विभागीय स्पर्धेमध्ये रुकडी येथील महात्मा गांधी विद्यालयच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र होण्याचा बहुमान मिळविला. या स्पर्धा लहान गट (14वर्षे) व मोठा गट (17वर्षे) अशा गटामध्ये पार पडल्या. लहान गटामध्ये विद्यालयाचा इयत्ता 8 वी मधील विद्यार्थी नमो संतोष पाटील याने सिल्वर मेडल प्राप्त केले. 17 वर्षे वयोगटामध्ये इयत्ता 9 वी मधील अमृता धनंजय गाताडे व स्नेहल संतोष कांबळे या विद्यार्थिनींनी सुवर्णपदाकाला गवसनी घालत राज्यस्तरासाठी पात्र होण्याचा मान मिळविला. जिद्द, आत्मविश्वास, कठोर मेहनत व पालकांचे व शिक्षकांचे मार्गदर्शन यामधून हे यश मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये देखील यश संपादन करण्याच्या दृष्टिकोनातून सराव सुरु असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य श्री. हजारे एम. एस. व क्रीडाशिक्षक श्री. मोरे एस. जी. तसेच किक बॉक्सिंग मार्गदर्शक निलेश परीट, आश्लेषा परीट व यासिन मुल्ला यांचे मार्गदशन लाभले.