पथनाट्य स्पर्धेत सेवंथ डे स्कूलचे यश
कोल्हापूर : दि :९
गार्डन क्लब कोल्हापूर व कोल्हापूर महानगरपालिका यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पथनाट्य स्पर्धेमध्ये सेव्हंथ डे स्कूल,कोल्हापूर यांचा तृतीय क्रमांक आला. 'आमची माती आमची माणसं' या विषयावर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. शाळेच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना प्रिन्सिपल टी. मोहन राव म्हणाले की, सर्वच क्षेत्रात आपल्या शाळेतील विद्यार्थी यश संपादन करीत आहेत याचा आम्हास सार्थ अभिमान आहे, शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी इतर कलागुणांची जोपासना करावी .यावेळी लेखक व दिग्दर्शक अनुप कांबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सहभागी विद्यार्थी कलाकारांमध्ये आदिती परीट, गायत्री कुंभार, सई यादव, अथर्व कदम, जानवी सचदेव ,शरयू कांबळे, तनिष्का काकडे, तनिष्का वांद्रे, प्रेषिता दाभाडे यांनी पथनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला .त्याचप्रमाणे वरद बोरगावे याला चित्रकला स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक मनोहर कर्नाड ,विनोद आवळे, पर्यवेक्षक जेनिफर लंका, सुनील घाटगे खजिनदार सुहास विल्सन सहशिक्षिका नीता नाडे सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.