प्रकाश सुतार यांची राष्ट्रीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार-२०२५ साठी निवड
कोल्हापूर: शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात क्रांतिकारी योगदानासाठी प्रकाश सुतार यांची राष्ट्रीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार-२०२५ साठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार सावित्रीमाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समतावादी व मानवतावादी विचारांचा आदर्श मानून विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो.
पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे सातव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाच्या निमित्ताने संपन्न होणार आहे. या समारंभात मा. प्रकाश सुतार यांचा मानाचा फेटा, सन्मानचिन्ह व पुस्तके देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
सामाजिक, शैक्षणिक व जनसेवेच्या क्षेत्रात मा. प्रकाश सुतार यांचे कार्य प्रेरणादायी असून, त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.