हातकणंगले तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात संपन्न
हेर्ले (वार्ताहर) हातकणंगले तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या या सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन हातकणंगले गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, गटशिक्षणाधिकारी रवींद्र चौगले, विस्ताराधिकारी नम्रता गुरसाळे,एन.जे.
पाटील , अजयकुमार बिरणगे
यांच्या हस्ते करण्यात आले.
या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये हातकणंगले तालुक्यातील तेरा केंद्रांनी सहभाग घेतला. या विविध सांस्कृतिक स्पर्धांचा निकाल अनुक्रमे खालील प्रमाणे: लहान गट:
समूहगीत: उर्दू विद्यामंदिर सहारा
नगर ,शाहूनगर चंदुर ,विद्या मंदिर आळते
समूहनृत्य: केंद्रशाळा पारगाव, कन्या विद्यामंदिर हेर्ले, संजीवन विद्यामंदिर चंदुर नाट्यीकरण: कन्या विद्यामंदिर माणगाव, कुमार विद्यामंदिर रांगोळी, कन्या विद्यामंदिर तारदाळ
कथाकथन: कन्या विद्यामंदिर रेंदाळ, कन्या विद्या मंदिर, आळते ,कुमार विद्या मंदिर शिरोली प्रश्नमंजुषा:
मानेनगर रेंदाळ, कुमार तिळवणी, विद्यामंदिर नरंदे
मोठा गट :समूहगीत: विद्यामंदिर मुडशिंगी, विद्यामंदिर मनपाडळे नंबर 1, कुमार विद्यामंदिर रांगोळी
समूहनृत्य: विद्यामंदिर मुडशिंगी, विद्यामंदिर सहारानगर रुई, विद्या मंदिर हालोंडी, कन्या विद्यामंदिर लाटवडे
नाट्यीकरण: कुमार विद्यामंदिर रांगोळी, विद्यामंदिर चोकाक, कन्या विद्यामंदिर तारदाळ
कथाकथन:
संजीवन माळभाग चंदुर ,विद्यामंदिर सहारानगर रुई ,विद्यामंदिर जुने पारगाव
प्रश्नमंजुषा विद्यामंदिर मजले, विद्यामंदिर मौजे वडगाव ,कुमार हुपरी नंबर 3
या तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या संघांची निवड जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेसाठी झाली आहे.
यावेळी विस्तार अधिकारी जे.टी.पाटील,गुलाब गंजेली, केंद्रप्रमुख भुपाल मंडगे,
मुख्याध्यापिका
मृणालिनी सुतार,केंद्रसमन्वयक राजेश पाटील, संजय मोरे, सुहास कदम,अनिल पवार,विजय माने यांच्यासह शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
.