पुणे: निसर्गराजा ग्रुप संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे शिव जयंती, महाशिवरात्री यात्रा व जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
या वर्षीचा "आदर्श संपादक" प्रेरणा पुरस्कार २०२५ हा पुरस्कार पुण्यातील मा. मेहबूब सर्जेखान यांना जाहीर झाला आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने बुधवार, २६ फेब्रुवारी २०२५ रोजी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.हा भव्य कार्यक्रम श्री मलकारसिद्ध मंदिर, महादेव मंदिर मागे, माणकापूर, ता. निपाणी, जि. बेळगाव (कर्नाटक राज्य) येथे सकाळी १०.३० वा. आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मा. मेहबूब सर्जेखान यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.