महाराष्ट्रात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे मजबूत संघटन : राजा माने
कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांनी जाहीर केली शाहूवाडी तालुका कार्यकारिणी : नूतन पदाधिकाऱ्यांना निवडपत्रे प्रदान
शाहूवाडी / प्रतिनिधी : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असून याद्वारे डिजिटल माध्यम क्षेत्रातील पत्रकारांचे मजबूत संघटन निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजा माने यांनी केले. शाहुवाडी तालुका कार्यकारिणी निवडीसाठी रविवारी कोल्हापूर येथे आयोजित बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांनी पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या तर श्री माने यांच्या हस्ते निवडपत्रे प्रदान करण्यात आली.*
शाहूवाडी तालुकाध्यक्ष सतीश वासुदेव नांगरे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारणीत तालुका उपाध्यक्ष म्हणून विकास पांडुरंग कांबळे यांची तर सचिव म्हणून उत्तम आनंदा राऊत यांची निवड करण्यात आली. खजिनदारपदी मारुती दगडू फाळके, संघटकपदी रमेश श्रीपती डोंगरे, संपर्कप्रमुखपदी रोहित चंद्रकांत पास्ते यांना संधी देण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून बजरंग तुकाराम पाटील, कृष्णा कांबळे,अनिल कांबळे यांची निवड करण्यात आली तर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी शंकर लक्ष्मण ढवळे यांची निवड झाली. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा श्री. माने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची शाहुवाडी तालुका कार्यकारिणी ताकतीने काम करून या क्षेत्रातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही तालुकाध्यक्ष सतीश नांगरे यांनी बैठकीत दिली. जिल्हा उपाध्यक्ष दीपक मांगले यांनी संघटनेच्यावतीने लवकरच गडहिंग्लज येथे जिल्ह्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी एकदिवशीय कार्यशाळा आयोजित केली जाणार असून त्याची तयारी गतीने सुरू असल्याची माहिती दिली. संघटनेच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनानिमित्त स्मरणिका प्रकाशित केली जाणार असून त्याकरिता जाहिरात समन्वयक म्हणून संतोष नाधवडे यांची निवड करण्यात आली. श्री राजा माने यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. रसूल जमादार यांनी आभार मानले.