हेरले येथे कै. ओंकार खुरपे स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
हेरले (ता. हातकणंगले) येथे कै. ओंकार खुरपे स्मृतिप्रीत्यर्थ सर्व मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर 23 फेब्रुवारी 2025 रोजी (रविवार) संपन्न झाले.
शिबिराला हेरले आणि परिसरातील युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. एकूण 60 युवकांनी रक्तदान करून समाजकार्याची भावना जपली. रक्तदान करणाऱ्या युवकांना छावा कादंबरी भेट म्हणून देण्यात आली.
या उपक्रमामुळे रक्तदानाच्या महत्त्वाविषयी जनजागृती होऊन समाजात सकारात्मक संदेश पोहोचला. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व मित्र परिवाराचे आणि सहकार्य करणाऱ्या युवकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.