कोल्हापूर शहर शिक्षकेतर सेवक संघटनेच्या भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात
कोल्हापूर : "स्पर्धेच्या युगात स्वतःसाठी वेळ देणे अवघड झाले आहे, पण उत्तम आरोग्यासाठी खेळाला वेळ द्यायलाच हवा. ताण-तणाव विरहित जीवनासाठी खेळ महत्त्वाचा आहे," असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. एकनाथ आंबोकर यांनी केले. ते कोल्हापूर शहर शिक्षकेतर सेवक संघटनेच्या भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
ही स्पर्धा शनिवार, दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता आणि रविवार, दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता होणार असून, एस्तेर पॅर्टन हायस्कूल टर्फ ग्राऊंड, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे आयोजिली आहे.
यामध्ये 11 संघांनी सहभाग नोंदवला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर चर्च कौन्सिलचे प्रॉपर्टी चेअरमन उदय विजापूरकर होते. यावेळी दादासाहेब मगदूम स्कूलचे मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद, कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, सचिव मनोहर जाधव, कोल्हापूर शहर शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, सचिव योगेश शेटे, उपाध्यक्ष रणजीत सदामते, संघटनेचे मार्गदर्शक प्रताप जगताप, संतोष संकपाळ, राहुल चोपडे, संभाजी साळोखे, प्रताप पाटील तसेच विविध शाळांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संभाजी साळोखे, रणजीत सदामते आणि संतोष संकपाळ यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार योगेश शेटे यांनी मानले.