कोल्हापूर (ता. हातकणंगले) | 15 मार्च 2025 – संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर येथे 6 वा पदवी वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात M.Tech (Civil Engineering – Structure) विभागातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या ऋतिका पाटील हिचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी युनिव्हर्सिटीच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या यशाचे कौतुक करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या मेहनतीचा गौरव संपूर्ण विद्यापीठासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगण्यात आले.
या सोहळ्यास विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापकवृंद, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऋतिका पाटीलच्या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन होत आहे.