रुकडीचे सुपुत्र सुनिल भारमल यांना "आदर्श समाजसेवक" पुरस्काराने गौरव
रुकडी (ता. हातकणंगले) – अत्यंत कमी वेळात सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे, मनमिळाऊ, प्रामाणिक आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व असलेले रुकडी गावाचे सुपुत्र श्री. सुनिल मारुती भारमल यांना वेदिका कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस, कोल्हापूर यांच्या मार्फत "आदर्श समाजसेवक" गुणरत्न पुरस्कार सहपत्नीक प्रदान करून गौरविण्यात आले.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, नवउद्योजक, कृषिरत्न आणि कला रंजन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला.
पुरस्कार वितरण कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त (कौशल्य, रोजगार, उद्योजक व नावीन्यता विभाग) श्री. जमीर करिम साहेब, माजी कुलगुरू, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर श्री. अभयकुमार साळोखे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर यांनी हजेरी लावली.
यावेळी सौ. अनिता सुनिल भारमल व सहपरिवार, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.