शिव-फुले-शाहू-आंबेडकर प्रबोधन विचारमंच कोल्हापूर आणि ऋतूजा फाउंडेशन, हेरले यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण, विद्यार्थी गौरव व सन्मान समारंभ
कोल्हापूर – शिव-फुले-शाहू-आंबेडकर प्रबोधन विचारमंच कोल्हापूर व ऋतूजा फाउंडेशन, हेरले यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण, विद्यार्थी गौरव व सन्मान समारंभाचे आयोजन सोमवार, दिनांक २६ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता शाहूस्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणार आहे.
या कार्यक्रमाच्या प्रमुख सन्मानार्थी म्हणून नव नियुक्त प्रथम वर्ग न्यायाधीश सौ. सायली ऋतूराज पाटील-झांबरे यांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र पी.आर.पी.चे अध्यक्ष डॉ. नंदकुमार गोंधळी हे राहणार आहेत.
प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये ज्येष्ठ संघर्ष अरण्य नेते मा. आर. बी. कोसंबी, पोलिस निरीक्षक गांधी नगर पोलिस ठाणे मा. अनिल तनपुरे, सामाजिक चळवळीचे नेते मा. बबनराव रानगे, सरपंच ग्रा.पं. मुढशिंगी मा. सौ. अश्विनी अरविंद शिरगावे, उद्योजक व जिल्हाध्यक्ष पी.आर.पी. मा. अशोकासर कांबळे (बापू) आणि हेरले ग्रा.पं. सदस्य मा. सौ. गीतांजली सुभाष चौगुले यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून मा. रत्न कांबळे (शिव-फुले-शाहू-आंबेडकर प्रबोधन विचारमंच कोल्हापूर) आणि मा. राकेश चौगुले (ऋतूजा फाउंडेशन, हेरले) काम पाहणार आहेत. यांच्यासह सिद्धार्थ कांबळे, संतीष कांबळे, संदीप चौगुले, रवींद्र चौगुले, गणेश कांबळे, शरद माने, रुपेश चौगुले, संदीप कांबळे यांचेही संयोजन आहे.
उल्लेखनीय म्हणजे या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सत्कार, गुणवंतांचा गौरव आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. समाज प्रबोधन आणि सामाजिक जागृतीसाठी उपयुक्त ठरणारा हा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडणार आहे.